Last Modified: लिस्बन , रविवार, 8 जुलै 2007 (09:16 IST)
ताजमहालच... 'सरताज'
मुगल बादशहा शहाजहानच्या प्रेमाचे प्रतिक असलेला ताजमहाल जगातील सात आश्चर्यांच्या यादित समाविष्ट करण्यात आला.
पोर्तुगालची राजधानी लिस्बन मधिल पोर्तुगाल बेनेफिका स्टेडियम मध्ये आयोजीत एका समारंभात जगातील सात आश्चर्यांची घोषणा करण्यात आली. यात ताजमहालचा समावेश करण्यात आला असून ताजमहाल जगातील सात आश्चर्यांचा सरताज बनला आहे, ताजने प्रथम स्थान पटकावले आहे.
ताजमहाल शिवाय या यादीत चीन ची भिंत, पेत्रा शहर जॉर्डन, स्टॅच्यू ऑफ क्राइस्ट रिडीमर- ब्राझिल, माचू पिच्छू- पेरू, चिचेन इत्जा- मॅक्सिको, रोमन कोलोसियम-इटली आदींचा समावेश करण्यात आला.
सात आश्चर्यांची निवड ऑन लाईन मतांद्वारे करण्यात आली.या मोहीमेत जगातील दहा कोटींहून अधिक लोकांनी आपली मते नोंदवली.
या निवडी दरम्यान एकानंतर एक सात आश्चार्यांची घोषणा केली जात होती. सहा नावांची घोषना करण्यात आली, आता बाकी होती शेवटची आणि प्रथम क्रमांकासाठीची अंतीम घोषणा. या साठी सिनेअभिनेत्री बिपाशा बसुला पाचारण करण्यात आले, आणि तीने नंबर एक आणि प्रथम क्रमांकावर ताजमहाल असल्याची घोषणा करताच भारतीलच नव्हे तर जगातील 'ताज' प्रेमींनी जल्लोष करत या निवडीचा आनंद लुटला.