द.चीनमध्ये महापूरः 75 ठार
दक्षिणी चीनमध्ये मूसळधार पाऊस सुरूच असून या पावसामुळे आलेल्या पुरात 75 जण वाहून गेले आहेत. तर 13 जण बेपत्ता झाले आहेत. या भागातील अनेक ठिकाणे जलमय झाली असून या पुरामुळे सुमारे नऊ लाख 38 हजार लोक बेघर झाले आहेत.
जूनच्या अखेरीपासून सुरू असलेल्या या पावसामुळे देशातील अनेक मोठ्या नद्यांमध्ये महापूर आला आहे. त्यामुळे दक्षिण चीनच्या 12 प्रांतांतील नऊ लाख 38 हजार लोक बेघर झाले आहेत. पावसाचा जोर अद्यापही ओसरण्याचे नाव घेत नसून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे.