1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

दहशतवाद मोडून काढू- गिलानी

देशात गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी कारवायांत वाढ झाल्याचे कबूल करत, पाकमधील दहशतवादाला मोडून काढण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे मत पाकचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांनी व्यक्त केले.

अमेरिकेचे शिष्टमंडळ सध्या पाक दौर्‍यावर असून, त्यांनी काल गिलानी यांच्याशी भेट घेऊन पाकमधील वाढत्या दहशतवादी कारवायांविषयी चिंता व्यक्त केली.

पाकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तालिबानी दहशतवाद्यांचे प्रस्थ वाढल्याचे सांगतानाच देशाच्या आर्थिक विकासाकडे इतके दिवस दुर्लक्ष झाल्याचे ते म्हणाले. यापुढे देशातील आर्थिक विकास घडवून आणताना दहशतवादही मोडून काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन गिलानी यांनी अमेरिकन शिष्टमंडळाला दिले.