नासाची फिनीक्स भरारी
तब्बल नऊ महिन्यांपासून मंगळ ग्रहावर पोहचण्यासाठी धडपडणार्या अमेरिकी अंतराळ यान फिनिक्सने काल अखेर दुपार नंतर मंगळावर यशस्विरीत्या लँडींग केले.
मंगळावर प्रथमच एखादे यान उतरत असल्याने या विषयी जगभरातील शास्त्रज्ञांना उत्सुकता लागली होती. सायंकाळी चार वाजून 53 मिनीटांनी हे यान यशस्विरीत्या मंगळावर उतरले आणि अमेरिकी शास्त्रज्ञांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
एका मिथकीय पक्षाचे नाव या यानाला देण्यात आले असून चार ऑगस्ट 2007 रोजी या यानाने आपला मंगळ प्रवास सुरू केला होता.
तासी 20 हजार किलोमीटर वेगाने हे यान मंगळावर पोहचले, यानंतर अमेरिकी शास्त्रज्ञांनी शेवटची सात मिनिटे 'सेवन मिनिट टेरर' असल्याचे म्हटले आहे, कारण या शेवटच्या मिनिटांमध्ये काहीही होण्याची भिती त्यांना वाटत होती.