नेपाळचे पंतप्रधान ओली यांचा राजीनामा
काठमांडू- नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. संसदेत त्यांचा सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता. त्याला उत्तर देण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे.
के. पी. ओली यांनी राष्ट्रपतींकडे स्वत:च्या पदाचा राजीनामा सुपुर्द केला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना नेपाळमध्ये कलम 305 लागू करण्याची मागणी केली आहे. दोन आठवडय़ांपूर्वीच ओली यांच्या सरकारला पा¨ठबा देणार्या माओवादी पक्षाने त्यांचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर ओली यांचे सरकार अल्पमतात आले.

