1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|

नेपाळमधील 'प्रचंड' ताकद

नेपाळमध्ये 'प्रचंड' ताकत
PTIPTI
नेपाळमधील राजेशाहीच्या अस्ताचे प्रमुख कारण बनलेल्या माओवादी नेते पुष्प कमल दहल अर्थात प्रचंड यांचे नाव आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांना माहीत झाले आहे.

इतके दिवस अमेरिकेच्या ब्लॅक लिस्टमध्ये असलेल्या प्रचंड यांची ताकत आता अमेरिकेनेही मान्य केली असून, ते नेपाळमधील सर्वात शक्तिशाली नेते म्हणून राजकारणात प्रसिद्ध झाले आहेत.

नेपाळमध्ये झालेल्या संसदेच्या निवडणुकीत 601 पैकी 220 जागांवर प्रचंड यांच्या सीपीएन पक्षाचे ( माओवादी) उमेदवार निवडून आले आहेत.

कृषी विषयातील तज्ज्ञ असलेल्या प्रचंड यांचा जन्म 11 डिसेंबर 1954 साली नेपाळमधील अन्नपूर्ण भागात झाला. त्यांचे बलपण चितवनमध्ये गेले. त्यांनी रामपूर येथील विद्यापीठातून कृषी आणि विज्ञान विषयाची पदवी मिळवली आहे.

यानंतर प्रचंड यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपालच्या (मशाल) आंदोलनात सहभागी होण्यास सुरुवात केली. आणि पाहता पाहता ते 1968 साली पक्षाचे महासचिव बनले. अनेक अंतर्गत संघर्षांचा सामना करत या पक्षाने कात टाकली आणि हा पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ ( माओवादी) बनला.

या पक्षाच्या बॅनरखाली प्रचंड यांनी 1996 पासूनच नेपाळ नरेशांच्या विरोधात सशस्त्र आंदोलनास सुरुवात केली. त्यांच्या या आंदोलनात सुमारे 13 हजार जणांचा बळी गेला.

काही दिवस ते अज्ञातवासात होते. याची कारणे कुणालाच माहित नाही. या काळात ते फार कमी वेळा दिसले.

नेपाळमध्ये प्रथम 1991मध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या. यानंतर माओवाद्यांनी अनेकांची देशात सर्रास कत्तल केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. यादरम्यान प्रचंड यांनी नेपाळचे पंतप्रधान गिरिजा प्रसाद कोईराला यांची भेट घेऊन संसद भंग करून माओवाद्यांना निवडणूकीत सहभागी करून घेण्याची त्यांनी मागणी केली.

यानंतर 30 डिसेंबर 2007 रोजी राजेशाहीचा अस्त करण्यात येणार असल्याचे अखेर निश्चित झाले आणि काल राजेशाहीचा अस्त करण्यात आला.

यानंतर आज नेपाळमध्ये प्रचंड यांची ताकद वाढली असून, त्यांच्याशिवाय नेपाळला पर्याय उरलेला नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.