1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

पाकचे तालिबानीकरण होतेय

तालिबानी दहशतवादी पाकमध्ये असल्याच्या चर्चांना आता पाकचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी स्वतः:च कबुली दिली आहे. हे दहशतवादी पाकमधील शांतता भंग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

देशात दहशतवादाचे प्रस्थ वाढत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली असून, देशात हिंसक कारवाया करण्यात या दहशतवाद्यांचा मोठा हात असल्याचे ते म्हणाले.

देशात तालिबानी दहशतवादी सक्रिय नसल्याचे काही दिवसांपूर्वीच मुशर्रफ यांनी स्पष्ट केले होते. आता त्यांनी स्वतः:च याची कबुली दिल्याने पाकमध्ये तालिबानीकरण होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.