पाकमध्येही 'महंगाई मार गयी'
जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये महागाईने थैमान घातले आहे. यात पाकही अपवाद नाही. पाकमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींत भरमसाठ वाढ झाल्याने जागो जागी फक्त एकच गाणे गुणगुणले जात आहे. आणि हे गाणे म्हणजे 'महागाई मार गयी'.
डब्लूएफपीने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. गेल्यावर्षी सहा कोटी लोकांची उपासमार झाली होती, यावर्षी त्याची संख्या 28 टक्क्यांनी वाढल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. आता हीच संख्या सात कोटी 70 लाख झाली आहे.
पाकमधील खाद्यपदार्थांच्या किंमतींत गेल्यावर्षीच्या मानाने 35 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे डब्लूएफपीचे म्हणणे आहे.