1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

पुतिन बनणार 'चेअरमन ऑफ पार्टी'

रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दमिर पुतिन यांचा कार्यकाल पुढील महिन्यात संपत आहे.त्यांनी राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर रशियाचा खरा आधुनिक विकास झाल्याचे सांगत त्यांना युनायटेड रशिया पार्टीच्या सर्वोच्चपदावर नियुक्त करण्याची तयारी रशियात सुरू झाली आहे.

यासाठी पार्टीच्या घटनेत बदल करण्यात येणार आहे. आतापर्यंत पार्टीने कोणालाही हे पद दिले नव्हते. पार्टीचा चेअरमन करून त्यांना पंतप्रधानपद देण्याची शक्यता आहे. पार्टीच्या दोन दिवसीय अधिवेशनात पुतिन यांना सुमारे 600 सदस्यांनी पसंती दिली असल्याने त्याचे पंतप्रधान बनणे निश्चित मानले जात आहे.