1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

बांगलादेशात नाव बुडून 40 ठार

बांगलादेशातील गोरातूरा नदीत एक नाव बुडून यातील 40 प्रवाशांना जलसमाधी मिळाली तर अनेक जण बेपत्ता असून मृतांची संख्या वाढण्याची भिती वर्तवली जात आहे.

नावेत दीडशे प्रवाशी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोरगंज जिल्ह्यातील निकाली गावाजवळ ही घटना घडली. एका वादळात अडकल्याने नावेला अपघात झाल्याचे बचाव दलाचे म्हणणे आहे.


यातील 40 जणांचे प्रेत बचाव दलाने नदीतून बाहेर काढले असून, 25 जणांना पोहता येत असल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.