1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

'बी पॉझिटिव्ह', मुलगाच होईल

गर्भावस्थेत आई जसा विचार करते तसे बाळावर संस्कार होत असतात असा समज आहे. हा समज आता संशोधकांनी पुन्हा एकदा यशस्वी प्रयोगाद्वारे खरा ठरवला आहे.

बाळ पोटात असताना आई जसा विचार करते तसा बाळाच्या प्रकृतीवर परिणाम होत असतो, इतकेच काय तर जर आई मुलाचा विचार करत असेल किंवा आईला जर मुलगी हवी असेल तर त्या विचाराच्या जोरावर मुलगा अथवा मुलगी होऊ शकते असा संशोधकांचा दावा आहे.

तसेच आई जितक्या जास्त प्रमाणावर सकारात्मक विचार करेल त्या आधारावर मुलगा होण्याची शक्यता अधिक असते. ब्रिटनच्या केंट विद्यापीठातील शिक्षक डॉक्टर सारा जोन्स यांनी याविषयीचे संशोधन केले आहे. यासाठी त्यांनी जवळपास 609 महिलांचे सर्वेक्षण केले.

यात त्यांना आढळून आले की पोटात बाळ असताना महिला आपल्या दीर्घायुष्य विषयीचा जितका अधिक विचार करतात, तितकीच त्यांना मुलगा होण्याची शक्यता अधिक असते.

याउलट ज्या स्त्रियांना अधिक कष्ट करावे लागतात त्या स्त्रियांना मुली होण्याची शक्यता जास्त असल्याचे जोन्स यांना आढळून आले आहे.

आपल्या सकारात्मक विचारांच्या माध्यमातून शरीरात एका विशिष्ट रसायनाची निर्मिती होते आणि या माध्यमातून शरीरात अनेक बदल घडून येतात असे जोन्स यांना या सर्वेक्षणात आढळून आले आहे.