1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Motorcycle collides with a truck in Palghar district

पालघर जिल्ह्यात ट्रकसोबत मोटारसायकलची भीषण धडक, तिघांचा मृत्यू

मंगळवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एका ट्रकसोबत मोटारसायकलची धडक होऊन १५ ते १८ वयोगटातील तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृतांची ओळख मोहित राकेश वर्मा, रवी विजय गुप्ता आणि नैना महातो अशी पटली असून, ते बोईसरमधील गणेश नगर भागातील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहित आणि रवी हे १२वीचे विद्यार्थी होते, तर नैना १०वीची विद्यार्थिनी होती. हे तिघे त्यांच्या मोटारसायकलवरून नांदगाव-आळेवाडी बीचकडे जात असताना, पाम टेंभीजवळ बोईसर-नवापूर रस्त्यावर त्यांच्या मोटारसायकलची मागून एका ट्रकसोबत धडक झाली. ट्रकचालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस त्याचा शोध घेत आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पुढील लेख
शरद पवार यांच्या निवृत्ती अफवांवर सुप्रिया सुळे यांचे सडेतोड उत्तर, म्हणाल्या....जनता निर्णय घेईल