1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

मंगळवारी पाकपंतप्रधानांचा शपथविधी

पाकिस्तानात पंतप्रधान नेमके कोण होणार या विषयी अजूनही साशंकता असतानाच, पाकिस्तानाचे नवे पंतप्रधान 25 मार्च नॅशनल असेंब्लीत शपथ घेतली असे राष्ट्रपती मुशर्रफ यांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.

यासाठी सोमवारी असेंब्लीत विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवारी पंतप्रधानांनी शपथ घेतल्यानंतर पुढील आठवड्यापर्यंत मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मुशर्रफ यांचे प्रवक्ते मेजर जनरल रशीद कुरेशी यांनी दिली आहे.

पीपीपी पक्षाला निवडणुकांमध्ये बहुमत मिळाले असून, बेनझीर यांचे विश्वासू युसुफ गिलानी हे पंतप्रधान होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.