1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

मिनीबस दुर्घटनेत आठ ठार

कोलेरॅडोवरून फोनिक्सला जात असलेल्या एका मिनी बस चालकाचा वळण रस्त्यावर बसचा ताबा सुटल्याने बस 41 फुट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून वीस जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

बस एक पलटी घेऊन दरीत कोसळली. पावसामुळे रस्ता ओलसर झाला होता. परंतु, या अपघाताचे ते मुख्य कारण नसून बस चालकाचा वळणावर ताबा सुटल्याने अपघात झाला असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या कॅमरॉन रोडेन यांनी सांगितले.

हा रस्ता वाहन चालकांसाठी एक आव्हान आहे. कारण, रस्ता खूपच वळणावळणाचा असल्यामुळे चालकाला या रस्त्यावर मोठी सावधानी बाळगावी लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.