1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

मुशर्रफ राजीनामा देणार?

पाकिस्तानातील राजकीय अस्थैर्य कायम असतानाच, राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या राजीनाम्याचे वृत्त पाकमध्ये अत्यंत चवीने चर्चिले जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही मुशर्रफ यांच्या राजीनाम्याचे वेध लागले आहेत. ब्रिटनमधील संडे टेलिग्राफ या वृत्त पत्राने मुशर्रफ यांच्या निकटवर्तीयांच्या हवाल्याने मुशर्रफ यांच्या राजीनाम्याचे वृत्त प्रकाशित केले असून लवकरच ते राजीनामा देणार असल्याचा दावा या वृत्तपत्राने केला आहे.