लाल मशीद कारवाईत दोनशे ठार!
लाल मशीदित आश्रय घेतलेले दहशतवादी व पाकिस्तानी सुरक्षा दलादरम्यान झालेल्या संघर्षात वरिष्ठ निमलष्करी दलाचा अधिकारी ठार झाला तर इतर जखमी झालेत. दरम्यान लष्कराने केलेल्या गोळीबारात भिंत कोसळून दोनशे विद्यार्थी ठार झाल्याचा दावा कट्टरपंथीयांनी केला आहे.
संघर्षात विशेष सेवा पथकाचे लेफ्टनंट कर्नल हारून उल इस्लाम यांना प्राण गमवावा लागला. मेजर तारिक जखमी झालेत. अंधाराचा फायदा घेवून पसार व्हायचा प्रयत्न करणार्या सहा दहशतखोरंना सुरक्षा पथकाने ताब्यात घेतले आहे. मशीदीचा उपप्रशासक अब्दुल रशिद गाजी यांच्या सुरक्षेसाठी तैनात दहशतवादी पथकाचा प्रमुख मोहमद असीमला ताब्यात घेतल्याचा दावा सुरक्ष पथकाने केला आहे.