शारजात २६७ भारतीयांना अटक
निवासी आणि कामगार कायद्यांचा भंग केल्याबद्दल २६७ भारतीय नागरिकांना शारजात अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांपैकी ६७ जणांजवळ ओळखपत्र वा कोणतेही कागदपत्र नाही.
संयुक्त अरब अमिरातने गेल्या वर्षी तीन लाख लोकांचा रहिवास दर्जा नियमित केल्यानंतर तेथील सरकारने केलेली पहिलीच मोठी कारवाई आहे.
अटक केलेल्या काहींजवळ व्हिसा होता. मात्र, त्याची मुदत अनके वर्षांपूर्वीच संपलेली होती. त्यांनी त्याचे नूतनीकरणही केले नव्हते. काही लोक ते ज्या कंपनीसाठी आले, तेथे काम न करता इतरत्र करत होते.