1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

हनीफची आजही चौकशी होणार

हनीफची आजही चौकशी होणार
ब्रिटनमधील दहशतवादी हल्ल्याच्या कटातील संशयित भारतीय डॉक्टर मोहम्मद हनीफ याची चौकशी आजही सुरू राहणार आहे. ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाचे पोलिस संयुक्तरित्या ही चौकशी करतील.

हनीफला सोमवारी पोलिसांनी ब्रिस्बेन येथील विमानतळावरून अटक केली होती. तो देश सोडून जाण्याच्या प्रयत्नता असल्याचे सांगण्यात आले. हनीफ गोल्ड कोस्ट हॉस्पीटलमध्ये रजिस्ट्रार म्हणून काम करतो.

चौकशीसाठी त्याची पोलिस कोठडीची मुदत सोमवारी रात्री साडेअकरापर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या चौकशीत कोणताही नवी माहिती हाती आली नसल्याचे ऑस्ट्रेलियातील पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले. हनीफ हा सबील व कफील यांचा भाऊ असून हे दोघे लंडनमधील दहशतवादी हल्ल्यातील मुख्य संशयित आहेत.
About Writer
भाषा