हमासशी चर्चा नाही: अब्बास
पॅलेस्टिनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी मुस्लिम संगटना हमास सोबत चर्चेची शक्यता फेटाळून लावली आहे. फतह नेत्यांशी झालेल्या चर्चेत अब्बास यांनी हमासशी चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले. हमासने आपल्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करतांनाच हमास सोबत समझोत्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.
दरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान यहूद ओल्मर्ट येत्या रविवारी पॅलेस्टिनचे राष्ट्रपती अब्बास यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. यावेळी पॅलेस्टिनची वर्तमनान राजकीय परिस्थिती व शांती प्रक्रिया सुरू करण्याच्या उपायांवर चर्चा होणार असल्याचे समजते. दोन नेत्यामंधील बैठक इजिप्तमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ शर्म अल शेख येथे होणार आहे. दरम्यान इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यलयाने बैठक होईल परंतू तारीख निश्चित नसल्याचे स्पष्ट केले आहे.