1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

हृदयरोगावर 'मांजर' रामबाण उपाय

धावपळीच्या या युगात प्रकृती उत्तम राखायची असेल तर व्यायाम करण्याचा सल्ला अनेक डॉक्टर देत असतात.काहीजण तर यासाठी वाटेल ते
करण्यास तयार असतात.


आता लंडनमधील वैज्ञानिकांनी हृदयरोगावर एक रामबाण उपाय शोधून काढला असून, घरात मांजर पाळल्यास रक्तचाप आणि हृदयरोगावर नियंत्रणास मदत मिळते असा त्यांनी दावा केला आहे.


मिनिसोटा विद्यापीठातील प्राध्यापक अदनान कुरेशी यांनी संशोधनाद्वारे हा दावा केला आहे. त्यांच्या मते घरात एखादे मांजर पाळल्यास रक्तचाप कमी होतो. आणि ताणावाशी निगडित असलेल्या हार्मोन्समध्ये बदल घडून येतात, यासाठी अदनान यांनी 4 हजार 435 जणांवर हा प्रयोगही करून पाहिला आहे.