गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. इंटरव्ह्यू टिप्स
Written By

व्हिसा इंटरव्ह्यूला जाताना....

नोकरी, शिक्षणाच्या निमित्तानं किंवा अगदी सहज म्हणून फिरायला जाण्यासाठीही आपर परदेशाची निवड करतो. परदेशात जायचं तर पासपोर्टसोबत व्हिसा हवाय. व्हिसाच्या मुलाखतीला जाताना व्हिसा मिळेल की नाही, मुलाखत कशी होईल, काय प्रश्न विचारले जातील असे अनेक विचार मनात घोळत असतात. म्हणूनच व्हिसा मुलाखतीला जाताना काही नियमांचं पालन करायला हवं. 
 
व्हिसाच्या मुलाखतीला तुम्ही तयारीत जायला हवं. तुमची सगळी कागदपत्रं नीट हवीत. त्या देशात गेलेल्या लोकांकडून थोडी माहिती ही मिळवता येईल. शिक्षण किंवा कामासाठी जाणार असाल तर ठराविक प्रश्न तुम्हाला विचारले जातील. भटकंतीला जाणार्‍यांसाठी वेगळे प्रश्न असतात. त्यामुळे परदेशात जाण्याचा उद्देश जाणून मुलाखतीची तयारी करा. 
 
* व्हिसा मुलाखतीसाठी तुम्हाला त्या देशाच्या दूतावासात बोलावलं जातं. त्या ठिकाणी जाताना काही वस्तू सोबत नेऊ नयेत. या दूतावासांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं न्यायला परवानगी नसते. त्यामुळे मोबाईल फोनशिवाय इतर कोणतंही गॅझेट तुमच्यासोबत ठेऊ नका. मोबाईलही सायलेंटवर टाका. 
 
* फार मोठ्या बॅगा, सॅक किंवा पर्स सोबत नेऊ नका. सुरक्षा तपासणीदरम्यान अडण येऊ शकते. 
 
* खाद्यपदार्थ किंवा पाण्याच्या बाटल्या शक्यतो सोबत नेऊ नका. दूतावासात ही सोय केलेली असते. 
 
* कॉस्मेटिक्स, डिओ न नेणंच चागंलं. 
 
* छत्र्या, एनव्हलप अशा वस्तू नेऊ नका. 
 
* व्हिसाच्या मुलाखतीला कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घ्या. आपल्यासोबत कागदपत्रं आणि मुलाखतीचा कागद आहे ना, याची खात्री करून घ्या आणि आत्मविश्वासानं या मुलाखतीला सामोरे जा.