गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 29 एप्रिल 2017 (08:31 IST)

गंभीर-मनोज तिवारी पुन्हा भिडले

नाईट रायडर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट संघांमधील सामन्यादरम्यान दोघे एकमेकाला भिडले. पंचांनीच मग प्रकरण हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली. बंगालचा कर्णधार मनोज तिवारी आणि गंभीरचे संबंध आधीपासूनच बिघडलेले आहेत. २0१५ साली बंगाल आणि दिल्लीमधील रणजी सामन्यादरम्यान गंभीर आणि तिवारीची खडाजंगी झाली होती आणि प्रकरण हातघाईवर गेले होते. बंगालचा फलंदाज पार्थ सारथी भट्टाचार्य बाद झाल्यावर मनोज तिवारी फलंदाजीला आला. तो चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला. गोलंदाज धावत येत असताना तिवारीने त्याला रोखले. त्याने ड्रेसिंग रूमकडे पाहून हेल्मेटची मागणी केली. यामध्ये वेळ गेला. दिल्लीच्या खेळाडूंना वाटले तिवारी वेळ काढतो आहे. तो तिवारीजवळ आला आणि त्याने अर्वाच्च शब्दांचा वापर करायला सुरुवात केली. एका वृत्तसंस्थेने तर वृत्त दिले की, गंभीर तिवारीला म्हणाला, संध्याकाळी भेट तुला माझा इंगा दाखवतो. तिवारीनेही त्याला तोडीस तोड उत्तर देत आव्हान केले. संध्याकाळपर्यंत कशाला थांबतोस आताच फैसला करुया. त्यावेळी पंच श्रीनाथ यांनी हस्तक्षेप केल्यावर गंभीरने त्यांनाही धक्का दिला.