शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By

दस साल आपके नाम आय पी एल आज पासून सुरु

यावर्षी आय पी एल १० वर्षात पदार्पण करत असून हे सर्व वर्ष प्रेक्षकांना वाहिली आहेत. तर दास साल आपके नाम ही टॅग लाईन ठेवली आहे. तर  इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या सीझनला आजपासून सुरूवात होणार आहे.  हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहे.  सीझनचा रंगारंग सोहळा पार पडेल. यात बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील स्टार्सचा जलवाही पाहायला मिळणार आहे.ओपनिंग सेरेमनी सायंकाळी ६ ते ६.३० पर्यंत सुरू राहील. आज होणाऱ्या या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सन परफॉर्म करताना दिसणार आहे.यंदा आयोजनकर्त्यांनी प्रत्येक टीमसाठी एक अशा एकूण आठ ओपनिंग सेरेमनी आयोजित केल्या आहेत. जेव्हा आय पी एल जेव्हा  उद्घाटन समारंभानंतर होईल तेव्हा  सीझन १० ची पहिली मॅच हैदराबादमध्येच सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीम्स दरम्यान खेळली जाणार आहे.