बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: दुबई , गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (08:51 IST)

चेन्नईच्या प्रत्येक सानन्यानंतर मैदानावर होते 'मास्टर क्लास'

आयपीएलच्या 13 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी अद्याप फारशी समाधानकारक झालेली नाही. मंगळवारी चेन्नईने हैदराबादविरुद्ध 20 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचे नेतृत्व आणि रणनीती याचे कौतुक होत आहे. सामना झाल्यानंतरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हारल होत आहेत.
 
या सामन्यात धोनी हैदराबादच्या काही खेळाडूंसोबत त्याचा अनुभव शेअर करताना दिसला. संबंधित खेळाडू त्याला काही शंका विचारत आहेत आणि त्यावर  धोनी त्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहे. यासाठी धोनीचे भरपूर कौतुक होत आहे. 
 
धोनी प्रियम गर्ग, शहबाज नदीमसह अन्य युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करताना दिसतो. एका व्हिडिओत धोनी त्यांना फलंदाजी संदर्भात मार्गदर्शन करत आहे.  या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो अनेकजण शेअर करत आहेत आणि धोनीचे कौतुक करत आहेत.