गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: अबुधाबी , मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (13:18 IST)

आयपीएलच्या ट्रॉफीवरील संस्कृत ओळीचा अर्थ

आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 19 सप्टेंबरपासून यूएईत तेरावा हंगाम खेळवला जाईल. अबुधाबीत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगेल. यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदा प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. आयपीएलची ट्रॉफी हा चर्चेचा विषय असतो, या ट्रॉफीवर संस्कृत भाषेत ओळ लिहिली आहे. ही ओळ डोळ्यांना सहज दिसत नसली तरीही या वाक्याचा अर्थ मोठा आहे.

वैदिक स्कूल या टि्वटर हँडलवर आयपीएलच ट्रॉफीवरील या संस्कृत ओळींचा अर्थ सांगण्यात आलेला आहे. यत्र प्रतिभा अवसर प्राप्नोतिही, ही संस्कृत गेली अनेक वर्ष आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले स्थान टिकवून आहे. या वाक्याचा अर्थ, जिथे तुमच्यातल्या प्रतिभेला संधी मिळते असा होतो.

भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता यंदाची स्पर्धा होणार की नाही यावर गेल्या   काही दिवसांत अनेक चर्चा सुरु होत्या. परंतु यंदाची स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला 4 हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता होती. यासाठी बीसीसीआयने स्पर्धा यूएईत हलवली.

दरम्यान तेराव्या हंगामासाठी बीसीसीआयने चिनी मोबाइल कंपनीसोबत करार स्थगित करुन आर ड्रीम 11 या कंपनीला 222 कोटी रुपयांमध्ये स्पॉन्सरशीपचे हक्क दिले.