दिल्लीचा पंजाबवर 7 गडी राखून विजय

dc
अहमदाबाद| Last Modified सोमवार, 3 मे 2021 (08:21 IST)
सलामीवीर
शिखर धवनने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर 7 गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करत कर्णधार मयंक अग्रवालने केलेल्या 99 धावांच्या नाबाद खेळीमुळे पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सला 167 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरादाखल दिल्लीने 3 गडी गमावत 17.4 षटकातच हे लक्ष्य गाठले.
पंजाबच्या 167 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी केली. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात सामनावीरचा मान पटकावलेला फिरकीपटू हरप्रीत ब्रार पुन्हा एकदा पंजाबसाठी धावून आला. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात पृथ्वीची दांडी गुल केली. पृथ्वीने 3 चौकार व 3 षटकारांसह 39 धावांची खेळी केली. त्यानंतर स्टीव्ह स्मिथला साथीला घेत शिखर धवनने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांनी संघाचे शतक फलकावर लावले. रिले मेरिडिथने स्मिथला 24 वर बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. विजयाच्या जवळ पोहोचताना ऋषभ पंतने मोठा फटका खेळण्याच्या नादात आपला बळी दिला. पंतनंतर शिमरोन हेटमायरने 4 चेंडूत 16 धावा कुटत विजयावर शिक्कामोर्तब केले. धवनने 6 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 69 धावांची खेळी केली.
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 166 धावा केल्या. के. एल. राहुलच्या अनुपस्थितीत प्रभासिमरन सिंगसह कर्णधार मयंक अग्रवालने सलामी दिली. मात्र, दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने प्रभासिमरनला 12 धावांवर बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. रबाडाने गेलचा त्रिफळा उडवला. पदार्पणाचा सामना खेळणार्‍या डेव्हिड मलानने अग्रवालसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. फिरकीपटू अक्षर पटेलने मलानची दांडी गुल करत पंजाबला तिसरा धक्का दिला. मलान बाद झाल्यानंतर मयंकला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्याने एका बाजूने संघाला सावरले. मयंकने 58 चेंडूत 8 चौकार व 4 षटकारांसह 99 धावांची नाबाद खेळी केली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने 4 षटकात 36 धावा देत 3 बळी टिपले. आवेश खान व अक्षरला प्रत्येकी 1 बळी घेता आला.
आजचा सामना
कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
ठिकाण ः नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.
वेळ ः सायंकाळी 7.30 वाजता.
इथे पहा लाइव्ह ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क व हॉटस्टार.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

आयपीएल रद्द झाल्यानंतरही डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पॅट ...

आयपीएल रद्द झाल्यानंतरही डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स यांना पूर्ण वेतन मिळेल, का ते जाणून घ्या
डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि स्टीव्हनं या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएल 2021 मधील ...

मलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार?

मलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार?
श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ...

पॅट कमिन्स वडील होणार आहेत, प्रेयसीने दिली चांगली बातमी तर ...

पॅट कमिन्स वडील होणार आहेत, प्रेयसीने दिली  चांगली बातमी तर वॉर्नरची बायको म्हणाली - ही खळबळजनक बातमी आहे
कोरोनाविरूद्धच्या लढाईत लढा देऊन भारतीयांना मदत करून आपली मने जिंकणारी कोलकाता नाइट ...

BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याची पुष्टी केली की ...

BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याची पुष्टी केली की आयपीएल 2021 चे उर्वरित सामने भारतात होणार नाहीत
आयपीएल 2021 पुढे ढकलल्यानंतर सर्व क्रिकेट चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की या ...

भारतीय क्रिकेटपटूंना फक्त कोविशील्ड वैक्सीन घ्यावी, ...

भारतीय क्रिकेटपटूंना फक्त कोविशील्ड वैक्सीन घ्यावी, त्यामागील कारण जाणून घ्या
इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2021) 14 वा सत्र अवेळी संपला. आता भारतीय खेळाडूंना पुढच्या ...