रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2021
Written By
Last Updated :चेन्नई , सोमवार, 12 एप्रिल 2021 (09:26 IST)

IPL-2021 : आज राजस्थान विरुद्ध पंजाब यांच्यात सामना

भारतात सध्या आयपीएलचा ‘रण’संग्राम सुरु आहे. आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये झुंज पाहायला मिळणार आहे. यावेळी हे दोन्ही संघ विजयाच्या हेतूने मैदानात उतरतील. स्टीवन स्मिथऐवजी संजू सॅमसनकडे राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता त्याच्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व लोकेश राहुल करणार आहे.
 
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 21 लढती पार पडल्या आहेत. राजस्थान रॉयल्सने 12 लढतींमध्ये विजय मिळवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पंजाब किंग्जला 9 लढतींमध्येच विजय संपादन करता आला आहे. त्यामुळे उद्या होणाऱया लढतीआधी राजस्थान रॉयल्सचे पारडे जड असणार आहे.
 
मात्र, यावेळी पंजाब किंग्स देखील जोरदार तयारीत दिसत आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वीच पंजाब किंग्सने जिंकण्याची तयारी दर्शवली होती. आज होणाऱ्या सामन्यात हे दोन्ही संघ विजयच्या हेतूने मैदानात उतणार आहेत. कोणता संघ बाजी मारणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.