गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: बुधवार, 27 एप्रिल 2022 (08:10 IST)

मुंबई इंडियन्समुळे तब्बल ४ संघ अडचणीत; कसं काय?

तब्बल आठ सामन्यांच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचा यंदाच्या पर्वाचा प्रवास जवळपास संपुष्ठात आला आहे. मात्र, मुंबई इंडियन्स संघाचे अद्याप काही सामने शिल्लक आहेत. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने जोरदार ठक्कर दिली तर काठावरील संघांना त्याचा फटका बसू शकतो. आता मुंबई इंडियन्सचा हा दणका कसा आणि कोणला बसतो, हे लवकरच स्पष्ट होईल.
 
मुंबई इंडियन्सचे अद्याप सहा सामने बाकी आहेत. या सहा सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न मुंबई इंडियन्सकडून होईल. मात्र, मुंबई इंडियन्सकडून पराभव स्विकारावा लागणाऱ्या संघाना त्याचा चांगला फटका बसू शकतो. मुंबई इंडियन्सचे यापुढचे सामने राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, चेन्नई सुपरकिंग्स, सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपीटल्ससोबत आहे. यातील राजस्थान आणि गुजरातचे संघ अव्वल चारमध्ये आहेत. मात्र, गुणांच्या तक्ता लक्षात घेता कोलकत्ता, दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई या संघाना मात्र पराभवाचा मोठा फटका बसू शकतो. विशेषत: चेन्नईला उर्वरीत सहा सामन्यात मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहे. चेन्नईला एक पराभव सुद्धा प्लेऑफमधून बाहेर काढू शकतो.