गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 12 मे 2022 (23:04 IST)

CSK vs MI : मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सनी पराभव, धोनीचा संघ स्पर्धेतून बाहेर

CSK vs MI: Mumbai Indians beat Chennai Super Kings by 5 wickets
CSK Vs MI 2022: IPL 2022 च्या 59 व्या सामन्यात, पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला 16 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 97 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 14.5 षटकांत 5 बाद 103 धावा करून सामना जिंकला. मुंबईने चेन्नईवर 5 विकेट्सने मात केली. मुंबईकडून टिळक वर्माने 34 धावा केल्या. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवातही चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये संघाने 4 गडी गमावले होते. इशान किशन 6, रोहित 18 धावा करून बाद झाला. सॅम्स 1 धावा, हृतिक 18 धावा आणि डेव्हिड 17 धावा. 
 
चेन्नईकडून धोनीने सर्वाधिक 36 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सॅम्सने तीन, मेरेडिथ आणि कार्तिकेयने प्रत्येकी दोन गडी बाद केले. चेन्नईचे फलंदाज डेव्हॉन कॉनवे आणि मोईन अली खाते न उघडता बाद झाले. उथप्पाने 1, ऋतुराजने 7 आणि रायुडूने 10 धावा केल्या. शिवम दुबेही 10 धावा करून बाद झाला. ड्वेन ब्राव्होने 12 धावा केल्या आणि सिमरजीत दोन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.