मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: बुधवार, 30 मार्च 2022 (13:14 IST)

IPL 2022:विराट कोहली ने पंजाबविरुद्धच्या सामन्यात मोडला वॉर्नरचा हा खास विक्रम

आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाला सामोरे जावे लागले .फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीला 205  धावा करूनही पंजाबविरुद्धचा सामना वाचवता आला नाही. माजी कर्णधार आणि पहिल्यांदाच या सामन्यात प्रवेश करणाऱ्या विराट कोहलीने मात्र आणखी एक कामगिरी आपल्या नावावर केली. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराटने शानदार खेळी खेळली आणि 29 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने नाबाद 41 धावा केल्या. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले.
 
विराट कोहली त्यांच्या  41 धावांच्या खेळी दरम्यान T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांपैकी एक बनला आहे. त्याच्याकडे आता 327 सामन्यांत 10,314 धावा झाल्या असून त्याने या बाबतीत डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. वॉर्नरने 313 सामन्यांमध्ये एकूण 10,308 धावा केल्या आहेत.
 
 T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली अजूनही आघाडीवर आहे.