गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Updated : बुधवार, 6 एप्रिल 2022 (16:09 IST)

KKR vs MI IPL 2022: मुंबई कोलकाताच्या विरोधात उतरणार, जिंकण्याची मोठी संधी

KKR vs MI IPL 2022: Mumbai will take on Kolkata
मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आहे. या संघाने पहिले दोन सामने गमावले असून गुणतालिकेत ते आठव्या स्थानावर आहे. दुसरीकडे कोलकाता संघाने तीन सामने खेळले असून दोन जिंकले आहेत, तर आरसीबीविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाताविरुद्ध मुंबईचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 29 सामने झाले आहेत. त्यापैकी 22 मुंबई आणि सात कोलकात्याच्या नावावर आहेत. अशा स्थितीत मुंबईला पहिला विजय मिळवण्याची मोठी संधी असेल. 
 
कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 6 एप्रिलला सामना होणार आहे. 
कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल, तर पहिला चेंडू 7.30 वाजता टाकला जाईल. 
 
आयपीएलचे प्रसारण हक्क स्टार नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे हा सामना स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरही प्रसारित होणार आहे. स्टार स्पोर्ट्स चॅनलवर  वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट सामने पाहू शकता. 
 
दोन्ही संघांचे प्लेइंग 11
 
कोलकाता प्लेइंग 11
अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नरेन, टीम साऊदी / पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती .
 
मुंबईचा प्लेइंग 11:
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), अनमोलप्रीत सिंग / सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.