शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: मंगळवार, 19 एप्रिल 2022 (09:45 IST)

RR vs KKR:राजस्थानने रोमहर्षक सामन्यात कोलकात्याचा पराभव केला,बटलरच्या शतकानंतर चहलची हॅट्ट्रिक

राजस्थान रॉयल्सने एका रोमांचक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सात धावांनी पराभव केला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानने 217 धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार पाडले. राजस्थानकडून जोस बटलरने शतक झळकावले, तर युजवेंद्र चहलने हॅटट्रिकसह पाच बळी घेतले.
 
आयपीएल 2022 चा 30 वा सामना रोमांचकारी पद्धतीने संपला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी राखून पराभव केला पण शेवटपर्यंत सामन्यात चढ-उतार होते. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने जोस बटलरच्या 103 धावांच्या शतकाच्या जोरावर 217 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा संपूर्ण संघ शेवटपर्यंत झुंज देत राहिला, परंतु 19.4 षटकांत 210 धावांतच गारद झाला.
 
या विजयासह राजस्थान रॉयल्सने पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली असून ते दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. दुसरीकडे, पराभवाची हॅट्ट्रिक केल्यानंतर केकेआर सहाव्या स्थानावर आहे. चहलला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.