शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: सोमवार, 29 मे 2023 (22:51 IST)

CSK vs GT IPL 2023 Final : फायनलमध्ये उतरताच इतिहास रचला, लीगमध्ये असे करणारा तो पहिला खेळाडू ठरला

CSK vs GT MS धोनीने IPL 2023 फायनलमध्ये नवीन विक्रम रचला MS धोनीने IPL 2023 च्या फायनलमध्ये मैदानात प्रवेश करताच इतिहास रचला आहे. या लीगमध्ये 250 सामने खेळणारा माही पहिला खेळाडू ठरला आहे.
 
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने IPL 2023 च्या अंतिम सामन्यात मैदानात उतरताच इतिहास रचला आहे. माही गुजरात टायटन्सविरुद्ध त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 250 वा सामना खेळण्यासाठी आला आहे. ही कामगिरी करणारा धोनी इंडियन प्रीमियर लीगमधील पहिला खेळाडू ठरला आहे.
 
गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात मैदानात उतरताच एमएस धोनीने विशेष दर्जा प्राप्त केला आहे. या लीगमध्ये 250 सामने खेळणारा धोनी पहिला खेळाडू ठरला आहे. माहीनंतर या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावाचा समावेश झाला आहे. रोहितने या लीगमध्ये आतापर्यंत 243 सामने खेळले आहेत. त्याचबरोबर दिनेश कार्तिक 242 सामने खेळून या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 
आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जेतेपदाच्या लढतीत सीएसकेने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 
 
आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धेचा अंतिम सामना राखीव दिवशी खेळवला जात आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये यापूर्वी कधीही चॅम्पियन संघ राखीव दिवशी ठरवला गेला नाही. 28 मे रोजी सतत पाऊस पडत होता आणि त्यामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. पावसामुळे मैदानाच्या खराब आउटफिल्डमुळे पंचांनी अंतिम सामना राखीव दिवशी घेण्याचा निर्णय घेतला.
 
 
Edited by - Priya Dixit