Dhoni Health Update : धोनी रुग्णालयात दाखल होणार, कारण जाणून घ्या
Dhoni will admitted to hospital for knee injury treatment : IPL 2023 विजेतेपद मिळाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधार महेंद्र सिंग धोनी रुग्णलयात दाखल होणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे कर्णधार धोनीला रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता आहे. चेन्नईच्या कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने सलग पाचव्यांदा विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे.
या हंगामात दुखापतीमुळे त्रस्त असलेला चेन्नई संघाचा कर्णधार धोनीवर कोकिलाबेन रुग्णालयात काही चाचण्या केल्या जाणार असून धोनी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे.
फायनल जिंकल्यावर सेलिब्रेशन करत असताना धोनीच्या गुडघ्याला पट्टा बांधलेला होता. धोनी निवृत्ती बाबत बोलला कीत्याला पुढील वर्षी देखील आयपीएल खेळायचं आहे आणि त्या साठी त्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. चाहत्यांनी मला भरभरून प्रेम दिल.
त्या साठी मी चाहत्यांना धन्यवाद दिले.
41वर्षीय धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने पाचव्या जेतेपदाला गवसणी घातली. पावसामुळे तिसऱ्या दिवसापर्यंत गेलेल्या चुरशीच्या आयपीएल फायनल मुकाबल्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सला नमवत जेतेपदावर नाव कोरलं. अहमदाबाद इथे रविवारी फायनलचा मुकाबला होणार होता. पावसामुळे रविवारऐवजी सोमवारी हा सामना सुरू झाला. गुजरातच्या डावानंतर जोरदार पावसाचं आगमन झालं. दोन तास खेळ स्थगित करावा लागला. सुधारित लक्ष्यानिशी खेळणाऱ्या चेन्नईने शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत पाचव्या जेतेपदाला गवसणी घातली. चेन्नईने याआधी 2010, 2011, 2018, 2021 या वर्षी जेतेपदावर कब्जा केला होता.
Edited by - Priya Dixit