संबंधित माहिती
- Virat Kohli: विराट कोहलीने इतिहास रचला, आयपीएलमध्ये विराटच्या 7000 धावा पूर्ण
- DC vs RCB : फिलिप सॉल्टने दिल्ली कॅपिटल्सला चौथा विजय मिळवून दिला, बेंगळुरूचा सात गडी राखून पराभव
- IPL 2023 MI Vs CSK : चेन्नईने मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव केला, गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले
- IPL 2023: KL राहुलच्या जागी लखनौने हा फलंदाज घेतला
- IPL 2023 MI vs CSK :चेन्नई सुपर किंग्जचा मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
IPL 2023:सामना संपल्यानंतर कोहली आणि गांगुली आमने सामने,दोघांनी हस्तांदोलन केले
social media
दोन्ही संघ एकमेकांशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे जात असताना विराट कोहली आणि सौरव गांगुली एकमेकांना टाळताना दिसले. दोघांनी हस्तांदोलन केले नाही आणि सोशल मीडियावर अफवा व्हायरल झाल्या की गांगुली यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कोहली आणि दादांमधील भांडण आहे.
अशा परिस्थितीत जेव्हा हे दोन संघ 6 मे रोजी पुन्हा आमनेसामने आले, तेव्हा पुन्हा एकदा नजर विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यावर होती. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सने सामना एकतर्फी जिंकला आणि सामन्यानंतर कोहली आणि गांगुली हात मिळवताना दिसले.
दोघांनी केवळ हस्तांदोलनच केले नाही तर प्रेमळ संभाषणही केले. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत. यावेळी चर्चा सकारात्मक होती आणि दोन दिग्गजांमध्ये सर्व काही ठीक आहे हे पाहून लोकांना आनंद झाला. सामन्यानंतर सौरव गांगुलीने विराट कोहलीला पाठीवर थोपटले.
सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष असताना कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. यानंतर त्याच्याकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्यात आले
Edited by - Priya Dixit
