संबंधित माहिती
- IPL 2023 नितीश राणा यांच्यावर मोठा दंड
- IPL 2023 KKR vs PBKS : कोलकाता कडून पंजाबचा पाच विकेट्सनी पराभव, नितीशचे अर्धशतक
- IPL 2023 KKR vs PBKS Playing-11: प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकाता आणि पंजाब आमने सामने
- GT vs LSG : आज पंड्या विरुद्ध पंड्या, 'या' आहेत IPL मधील भावांच्या जोड्या
- PBKS vs MI IPL 2023 : मुंबईने पंजाबचा सहा गडी राखून पराभव केला, इशान किशन आणि सूर्यकुमारची अर्धशतके
IPL 2023 : प्रभसिमरन सिंगचं तडाखेबंद शतक
social media
धावांच्या राशी आणि शतकांचे रतीब यामध्ये प्रभसिमरन सिंग या भारतीय खेळाडूने दमदार भर घातली. पंजाब किंग्जतर्फे खेळणाऱ्या प्रभसिमरन सिंगने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना खणखणीत शतकाची नोंद केली. प्रभसिमरनचं आयपीएल स्पर्धेतलं हे पहिलंच शतक आहे.
पंजाब किंग्ज आणि पूर्वीच्या किंग्ज इलेव्हन पंजाबतर्फे शतक झळकावणारा प्रभसिमरन बारावा फलंदाज ठरला आहे. याआधी शॉन मार्श, माहेला जयवर्धने, पॉल वल्थाटी, अडम गिलख्रिस्ट, डेव्हिड मिलर, वीरेंद्र सेहवाग, वृद्धिमान साहा, हशीम अमला, ख्रिस गेल, के.एल.राहुल, मयांक अगरवाल यांनी शतकी खेळी केल्या आहेत.
आयपीएल स्पर्धेत शतक झळकावताना भारतासाठी न खेळलेल्या मोजक्या खेळाडूंमध्येही प्रभसिमनरचा समावेश झाला आहे. मनीष पांडे, पॉल वल्थाटी, देवदत्त पड्डीकल, रजत पाटीदार, यशस्वी जैस्वाल या यादीत आता प्रभसिमरने स्थान पटकावलं आहे.
प्रभसिमरनचं हे स्पर्धेतलं पाचवं वर्ष आहे. सगळी वर्ष प्रभसिमरन पंजाब किंग्ज संघाचाच भाग आहे.
पंजाब किंग्जचा सलामीवीर प्रभसिमरन सिंगने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. त्याने 18व्या षटकातील चौथ्या चेंडूवर खलील अहमदला चौकार मारून शतक पूर्ण केले. आयपीएलच्या चालू मोसमात शतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे.
Edited By - Priya Dixit
