सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Updated : शुक्रवार, 24 मार्च 2023 (16:23 IST)

IPL 2023: सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्समध्ये परतले, फ्रँचायझीने दिली मोठी जबादारी

saurab ganguly
भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सशी हातमिळवणी केली आहे. फ्रँचायझीने त्यांना यावेळी मोठे पद दिले आहे. गांगुली तीन फ्रँचायझी संघांचे संचालक असणार. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीकडे आंतरराष्ट्रीय लीग T20 (ILT20) आणि SA T20 (ILT20) मध्ये आणखी दोन संघ आहेत.
 
गांगुलीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी यापूर्वी दिल्ली कॅपिटल्समध्ये काम केले आहे. 2019 मध्ये  ते संघाचे  मार्गदर्शक होते .यावेळी ते दिल्ली कॅपिटल्स तसेच इंटरनॅशनल लीग T20 संघ दुबई कॅपिटल्स आणि SA T20 संघ प्रिटोरिया कॅपिटल्सचाही संचालक असणार. 
 
आयपीएल 2023 साठी दिल्ली संघ
ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड या खेळाडूंना खरेदी केले. वॉर्नर, पृथ्वी शॉ, मनीष पांडे, फिलिप सॉल्ट, रिले रुसो, रिपल पटेल, रोव्हमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, अॅनरिक नोर्टजे, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, इ. मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, मुकेश कुमार.
 
ऋषभ पंत अपघाताला बळी पडल्यानंतर डेव्हिड वॉर्नरला आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवले जाऊ शकते. आयपीएलपूर्वी पंत फिट झाल्यास तो कर्णधारपदाची धुरा सांभाळेल. 
 
Edited By - Priya Dixit