मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मे 2023 (23:06 IST)

यशस्वी जैस्वालच्या विक्रमी खेळीमुळे राजस्थानने 'रॉयल्स'चा विजय नोंदवला आणि टॉप 3 मध्ये स्थान मिळवले

jaiswal
नवी दिल्ली. आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळलेल्या यशस्वी जैस्वालने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध धडाकेबाज खेळ केला. केकेआरच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत यशस्वीने विक्रमी खेळी खेळली. यशस्वीने 47 चेंडूत 13 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 98 धावांची खेळी केली. याआधी यशस्वीने या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्याने 13 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
   
 केकेआरने दिलेल्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने 13.1 षटकात 1 बाद 151 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसन 29 चेंडूत 48 धावा करून नाबाद परतला. राजस्थानचा 12 सामन्यांमधला हा सहावा विजय आहे तर केकेआरचा 12 सामन्यांमधला सातवा पराभव आहे.