शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

कोलकाता-पंजाब संघात आज लढत

WD
सहाव्या आपीएल क्रिकेट स्पर्धेत ट्वेंटी-20 साखळी सामान्यात कोलकाता संघावर आपले विजेतेपद सुरक्षित ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. शुक्रवारी यजमान कोलकाता नाईट राडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघात येथे साखळी सामना खेळला जात आहे.

इडन गार्डनवर बुधवारी रात्री अत्यंत अटीतटीच विलक्षण रंगलेल्या सामन्यात मुंबईने कोलकाता संघाचा पाच गडी आणि एक चेंडू राखून पराभव केला. कोलकाता संघाचा हा सातव सामन्यातील पाचवा पराभव ठरला. माजी विजेत कोलकाता संघाने या हंगामात फक्त दोन विजय मिळविले आहेत. एकूण सोळा साखळी सामने या संघाला खेळावयास मिळतील.

आपले विजेतेपद पुन्हा कायम ठेवायचे असेल तर कोलकाता संघाला उर्वरित नऊपैकी सात सामने जिंकावे लागतील. कोलकाता संघ चार गुणासह सातव्या स्थानी घसरला आहे. पंजाबचा संघ हा कमकुवत समजला जातो. तरीही या संघाने एका पाठोपाठ एक विजय मिळविलेले आहेत. पंजाब संघाने सात सामन्यात चार विजय मिळविलेले आहेत. त्यामुळे या संघाला कमी लेखून चालता येणार नाही.