बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

श्रीसंत, चव्हाणची अय्याशी उघड

WD
श्रीसंत आणि अंकित चव्हाण यांची अय्याशी चंदीगड येथील एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमे-यामुळे समोर आली आहे. मॅच संपल्यानंतर हे दोघेही बुकी जीजू आणि मुलीबरोबर हॉटेलमध्ये जात आणि दुस-या दिवशी सकाळीच ते परत येत. चंदीगड येथील एका हॉटेलमधील सहा सीसीटीव्ही कॅमे-यांमुळे श्रीसंत आणि चव्हाणच्या ’ या’ कृत्याची माहिती समोर आली.

राजस्थान रॉयल्स टीम ८ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजता हॉटेलमध्ये परतली होती. त्याच्या २ तासानंतर श्रीसंत, चव्हाण आणि सट्टेबाज जीजूचा खेळ सुरू झाला. रात्री सव्वा दहावाजता चव्हाण आणि जीजूने श्रीसंतचा दरवाजा नॉक केल्याचे फुटेजमध्ये दिसते. चव्हाणच्या हातात त्यावेळी एक गिफ्ट बॅगही दिसते. श्रीसंतने दरवाजा उघडला. दहा मिनिटानंतर एक काळे कपडे घातलेली मुलगी तिथे आली. काही वेळानंतर आणखी दोन लोक तिथे आले. ती मुलगी श्रीसंतच्या रूमजवळच उभी होती.

रात्री १०.५५ वाजता चव्हाण, श्रीसंत आणि ती मुलगी हॉटेलमधून बाहेर गेले. चार तासानंतर श्रीसंतला पांढरा आणि काळा ड्रेस घातलेल्या मुलीबरोबर पाहण्यात आले. त्यावेळी रात्रीचे २ वाजून १९ मिनिटे झाले होते. श्रीसंत त्या मुलीला आपल्या रूममध्ये घेऊन जाताना दिसला. चव्हाण पण त्याच्यामागे गेला. त्यानंतर सुमारे दोन तासानंतर म्हणजे पहाटे ३ वाजून ५५ मिनिटांनी श्रीसंत रूममधून एकटाच बाहेर आला.