1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या

'मॅन ऑफ द मॅच' भारतीयांसाठी नाही...

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार प्राप्त करण्याचे रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. परंतु, इंडियन प्रिमीयर लीगच्या पहिल्या 12 सामन्यावर नजर टाकली असता असे दिसून येते की, या हाय प्रोफाइल ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत हा पुरस्कार भारतीयांसाठी नसून विदेशी खेळाडूंसाठी आहे.

तेंडुलकर दुखापतीमुळे आतापर्यंत आयपीएलच्या एकाही सामन्यात खेळू शकला नाही. पण, इतर भारतीय दिग्गज फलंदाजांनीही चांगले प्रदर्शन केले नाही. जगातील गोलंदाजांना महाग पडणारे सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, युवराजसिंग आणि महेंद्रसिंग धोनी आपल्या घरच्या मैदानावर धावा करण्यासाठी झुंजावे लागत आहे.

या दिग्गजांच्या खराब प्रदर्शनामुळे 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार भारतीयांवर रूसल्याचा दिसतो. आतापर्यंतच्या 12 सामन्यात केवळ दहा फलंदाज हा पुरस्कार प्राप्त करण्यास यशस्वी झाले आहेत.

एखाद्या भारतीयाला हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी सातव्या सामन्यापर्यंत वाट पहावी लागते. दिल्ली डेअर डेविल्सचा कर्णधार विरेंद्र सेहवागने डेक्कन चार्जर्सविरूद्ध केलेल्या नाबाद 94 धावांच्या तुफानी खेळानंतर हा पुरस्कार त्याला मिळाला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या युसुफ पठाणने हैदराबा‍दविरूद्ध केलेल्या 61 धावांसाठी त्याला 'सामनावीर' म्हणून घोषीत करण्यात आले.

विदेशी खेळाडूंनी विशेष करून ऑस्ट्रेलियाई क्रिकेटरने एक लाखाचा चेक प्राप्त केला. राजस्थान रॉयल्सच्या ऑस्ट्रेलियाई अष्टपैलू शेन वॉटसनने दोनदा हा परस्कार मिळविला. तसेच, हसी बंधु, माइक आणि डेविड यांच्याशिवाय हेडनलाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारासाठी निवडले गेले.

आतापर्यंत केवळ दोनच गोलंदाजांना या पुरस्काराचा सम्मान मिळाला आहे. त्यामध्ये दिल्ली संघाकडून खेळणार्‍या श्रीलंकाई फरवेज माहरूफ आणि जेकब ओरमने कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध 32 धावा देऊन तीन बळी मिळविल्याबद्दल त्याला या पुरस्कारासाठी निवडण्यात आले.