1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या

आयपीएल तिकीट दरात घट

आयपीएलच्या तिकीट दरात घट
पंजाब क्रिकेट संघाने प्रेक्षकांना स्टेडियमवर बोलविण्यासाठी एक युक्त‍ी वापरली असून त्यांनी इंडियन प्रिमीयर लीगच्या सामन्यासाठी तिकीट दर कमी केले आहेत.

श्रीशांतच्या मुस्कटात मारल्याची घटना सोडता सर्व सामने यशस्वी झाले असून आयपीएलच्या दुसर्‍या चरणासाठी आम्ही तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पंजाब क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष आय. बिंद्रा यांनी सांगितले.

3 मे रोजी होणार्‍या कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध पंजाब संघाचा सामना पाहण्यासाठी बॉलीवूड स्टार आणि कोलकाता आयपीएल टीमचा मालक शाहरुख खान येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या सामन्यासाठी 750 रूपयाचे तिकीट 400 रूपयात उपलब्ध होणार असून 2000 रूपयाचे तिकीट 1000 आणि 3000 रूपयाचे तिकीट 1500 रूपयाला मिळणार असल्याचे पंजाब संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नील मॅक्सवेल यांनी सांगितले.
About Writer
भाषा