कर्णधार पदाचा मला आनंद- सचिन
आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळताना एक वेगळाच अनुभव येत असून मी त्याचा आनंद घेत असल्याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूरलकरने सांगितले आहे.
भारतीय संघाच्या कर्णधार पदाला नकार दिल्यानंतर पुन्हा ट्वेंटी-20 स्पर्धेत मिळालेले कर्णधार पद अनुभवाला चांगले वाटत असल्याचेही त्याने सांगितले. अनेक दिवसांनंतर मी कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळत असल्यामुळे एक वेगळाच अनुभव मिळत आहे.
दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरवातीच्या सामन्यात खेळता न आल्यामुळे त्याच्या जागी दक्षिण आफ्रीकेच्या शॉन पोलॉकने कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली होती.
सनथ जयसूर्या आणि शॉन पोलॉक या संघातील दोन आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर माझ्या अनुपस्थितीत पडलेली जबाबदारी आता आम्ही सर्वजण मिळून पार पाडणार आहोत.