1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या

किंग इलेव्हनचा पाचवा विजय

बंगलोरच्या रॉयल चॅलेजर्सचे चॅलेंज संपुष्टात आणत प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन्सने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.

राहुल द्रवीडच्या नेतृत्वाखालील चॅलेंजर्सने 20 षटकांचा सामना करत 126 धावा केल्या होत्या. त्यांची सुरुवात अत्यंत खराब झाली. श्रीशांत, पठाण यांच्या भेदक मार्‍यापुढे त्यांचा किंचितही निभाव लागला नाही.

15 धावांवर चॅलेंजर्सचे 3 खेळाडू तंबूत परतल्यानंतर द्रवीडने चिवट खेळ करत 66 धावांचे योगदान दिले. परंतु त्यांचे हे आव्हान पंजाबने 19 व्या षटकातच पूर्ण केले. इलेव्हनचा हा सलग पाचवा तर चॅलेंजर्सचा हा सलग पाचवा पराभव आहे.