Kkr Wins Their First Match | केकेआरची विजयी सलामी
WD
विजयासाठी 129 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणार्या कोलकात्याला डावाच्या दुसर्याच षटकात धक्का बसला आणि नेहराने मनविंदर बिसलास 04 धावांवर बाद केले. कर्णधार गौतम गंभीर आणि अनुभवी जॅक्स कॅलिसने दुसर्या गड्यासाठी 46 धावा जोडल्यानंतर शाहबाज नदीमने कॅलिसला 23 धावांवर बाद केले. गंभीर आणि मनोज तिवारीने 41 धावा जोडून संघाचा विजय आटोक्यात आणल्यानंतर बोथाने गंभीरला 42 धावांवर, तर सहा धावांची भर पडल्यानंतर नदीमने तिवारीला 23 धावांवर बाद करून कोलकात्याची स्थिती चार बाद 99 अशी केली. गंभीर यांनी उभ्या केलेल्या मजबूत पायावर मनोज तिवारी (२३), ईयॉन मॉर्गन (१४*) आणि युसूफ पठाण (१८*) यांनी विजयी मिळवून दिला.
