1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या

गांगुली व धोनी आज परस्परांशी झुंजणार

सलग दोन सामने जिंकलेले कोलकता नाईट रायडर्स व चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ परस्परांशी आज (ता.२५) भिडणार आहेत. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली व विद्यमान कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यात ही लढत रंगणार आहे.

कोलकता नाईट रायडर्स सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाकडे गोलंदाजांचा चांगला ताफा आहे. फलंदाजीही मजबूत आहे. त्यामुळे या संघाला हर विणे सोपे नाही.

त्याचवेळी चेन्नईची फलंदाजी मजबूत आहे. पण त्यांचे गोलंदाज कोलकत्याच्या बॅंडन मॅकलुम, रिकी पॉंटींग व डेव्हिड हसी यांना रोखू शकतात का हा प्रश्न आहे.

चेन्नईकडे मॅथ्यू हेडन व माईक हस्सी हे बडे खेळाडू आहेत. सुरेश रैनासुद्धा फॉर्ममध्ये आहे.

कोलकत्याकडे इशांत शर्मा, अशोक डिंडा, मोहम्मद हाफिज, मुरली कार्तिक व अजित आगरकर या गोलंदाजांचा ताफा आहे. त्याचवेळी यजमानांची गोलंदाजी मात्र कमजोर आहे.