मुंबई इंडियन्सला पहिले विजेतेपद
केरॉन पोलार्डच तडफदार नाबाद चार धावा, मलिंगा, जॉन्सन आणि हरभजनची प्रभावी गोलंदाजी याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने इडन गार्डन्सवर चेन्नई सुपर किंग्जचा 23 धावांनी पराभव केला आणि पहिलेच आयपीएल विजेतेपद मिळविले.मुंबईने पहिल्या दोन साखळी सामन्यात चेन्नईचा 9 आणि 60 धावांनी पराभव केला होता, तर पहिल्या क्वॉलिफायर सामन्यात मुंबईला 48 धावांनी नमविले होते. पोलार्ड, दिनेश कार्तिक व अंबाटी रायडूमुळे मुंबईने 9 बाद 148 धावा केल्या होत्या.विजासाठी 149 धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 9 बाद 125 धावा करू शकला. चेन्नईने यापूर्वी पाचवेळा अंतिम फेरी गाठली होती व दोन विजेतेपदे पटकाविली होती. विजेतेपदाची हॅट्ट्रिक हुकली.मुंबईप्रमाणे चेन्नईची सुरुवात खराब झाली. मलिंगाने माईक हसीला 1 धावावर त्रिफळा चीत केले तर सुरेश रैनाला शून्यावर बाद केले. त्याचा झेल स्मिथने घेतला. जॉन्सनने बद्रीनाथला शून्यावर टिपले. चेन्नईची स्थिती 3 बाद 3 झाली. ब्रॉव्होने 15 धावा काढल्या. धवनने ब्राव्होचा महत्त्वाचा बळी मिळविला. हरभजनने जडेजाला शून्यावर परत पाठविले तर त्यानेच ख्रिसमॉरिसलाही शून्यावर बाद केले. धोनी व अश्विन याने नवव्या जोडीस 39 धावांची भर घातली तर धोनीने मोहित शर्मासह (नाबाद 0) नाबाद 26 धावांची भर घातली. धोनीने शेवटपर्यंत विजासाठी प्रयत्न केले. त्याने 45 चेंडूत 3 चौकार व 5 षट्कारासह नाबाद 63 धावा केल्या. ओझाने मोरकेल (10 चेंडू 1 षट्कार 10) याला बाद केले. मुंबईकडून मलिंगाने 22 धावात 2, जॉन्सनने 19 धावात 2, हरभजनने 14 धावात 2, तर ओझा व धवन याने 1-1 गडी टिपला.