दुखापतीतून सावरल्यानंतर उमरान मलिकचे शानदार पुनरागमन, पहिल्याच स्पेलमध्ये २ विकेट घेण्याचा पराक्रम
उमरन मलिक बऱ्याच काळानंतर मैदानावर आला आणि त्याने चेंडूने चमत्कार केले. दुखापतीतून सावरल्यानंतर उमरानने पहिल्याच स्पेलमध्ये २ विकेट घेण्याचा पराक्रम केला.
भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख स्टार उमरान मलिक दुखापतीमुळे बराच काळ मैदानापासून दूर राहिला. दुखापतीमुळे उमरान गेल्या आयपीएल हंगामात खेळू शकला नाही.
आता उमरान मलिकने क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केले आहे. उमरानने ऑल इंडियन बुची बाबू स्पर्धेत त्याच्या पहिल्याच सामन्यात चेंडूने चमत्कार केले आहे. ओडिशा क्रिकेट असोसिएशनविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार पुनरागमन केले आणि त्याच्या पहिल्याच स्पेलमध्ये २ विकेट घेण्याचा पराक्रम केला.
Edited By- Dhanashri Naik