1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या

मुंबईने रोखला राजस्थानचा 'विजयरथ'

सलग पाच विजय संपादन करत आयपीएल सामन्यात प्रथम स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सचा विजयरथ अंबानींच्या मुंबई इंडियंन्सने काल रोखला.

डी वाय पाटील मैदानावर झालेल्या या सामन्यात मुंबई करांनी आपल्या संघाला जोरदार पाठिंबा देत सुरवातीपासूनच मैदान डोक्यावर घेतले होते.

मुंबई संघाच्या भेदक गोलंदाजीपुढे राजस्थानचे फलंदाज केवळ 103 धावांमध्ये गारद झाले. आयपीएल मालिकेतला हा आतापर्यंतचा दुसरी कमी धावसंख्या आहे.

सलग सातव्या सामन्यात सचिनची अनुपस्थिती प्रेक्षकांना चांगलीच जाणवत होती. मैदानाबाहेरून सचिनने मुंबई संघातील खेळाडूंना चांगले प्रोत्साहन दिले.

मुंबई संघाकडून रॉबीन उत्थप्पाने 34 धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याला इतर फलंदाजांनी चांगली साथ दिली.