राजस्थानचा सहा गडी राखून विजय
कोलकाता उपांत्य पूर्व फेरीच्या शर्यतीतून बाहेर
|
युसुफ पठाण आणि कैफने पाचव्या विकेटसाठी केलेल्या विजयी 81 धावांच्या भागिदारी केवळ 40 चेंडूत पूर्ण केली आणि संघाला 21 चेंडू शेष ठेवून विजय मिळवून दिला.
राजस्थानचा संघ अगोदरच उपांत्य पूर्व फेरीत पोहचला होता. परंतु, कोलकाता नाईट रायडर्सला आजचा सामना 'जिंका किंवा मरा' अशा स्वरूपाचा होता. मात्र, संघाचा पराभव झाल्यामुळे उपांत्य पूर्व फेरीच्या शर्यतीतून कोलकाता बाद झाला आहे.
प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने राजस्थानपुढे विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्यांनी 16.3 षटकात चार गडी गमावून 150 धावा केल्या. स्कोर बोर्डवर धावसंख्या कमी असल्यामुळ पराभव झाला असल्याचे कोलकात्याचा कर्णधार सौरव गांगुली याने सांगितले.

